उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो | Udo Bola Udo Bola Ambabai Aarti Lyrics Marathi - Description
Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho is one of the most popular Aarti sung during the Navratri. Aarti is a very essential part of a Puja. Any Puja can’t be completed without the Aarti of that particular deity. This aarti is very much vibrating and filled with positive energy. You can feel better by singing this aarti.
गुरुवार, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी, घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल। यंदा नवरात्राचा कालावधी आठच दिवसांचा असून, अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून नवरात्राला प्रारंभ होतो। नवरात्रोत्सवाची सांगता अश्विन शुद्ध दशमी या तिथीला होते। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने खास आपल्यासाठी नवरात्रीची आरती।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो नवरात्रीची आरती PDF
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||उदो बोला
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळा चामुंडा मिळूनी हो || २ ||उदो बोला
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||उदो बोला
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली भक्त लोटांगणी हो || ४ ||उदो बोला
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे क्रिडता हो || ५ ||उदो बोला
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||उदो बोला
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरचेवरी हो || ७ ||उदो बोला
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||उदो बोला
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो || ९ ||उदो बोला
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||उदो बोला
How to Recite Udo Bola Udo Bola Ambabai Maulicha Ho Aarti
- Firstly get ready after taking bath.
- Place a wood plank and cover it with red cloth.
- Invoke Goddess Amba at the Puja place.
- Now Recite Navratri Vrat Katha.
- After reciting the Katha now sing Udo Bola Ambabai Aarti.
- At the end take the blessings of Mata Amba
You can download उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो pdf by clicking on the following download button.