सरपंच निवडणूक नियम 2022 Marathi PDF Summary
नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला सरपंच निवडणूक नियम 2022 PDF साठी डाउनलोड लिंक देत आहोत. १९९२ भारतीय राज्यघटनेत स्थानिक स्वराज्य ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा/पंचायत समित्या, नगर परिषदा/नगरपंचायती व महानगरपालिका यांच्या निवडणूका मुक्तपणे आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात एक राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापना करण्यात आली.
नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, निवडणूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, मतदान आणि मतमोजणी हे निवडणूक कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे आहेत.
सरपंच निवडणूक नियम 2022 PDF
- ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक किंवा कोणतेही रिक्त पद भरण्यासाठी घ्यावयाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग नेमून देण्यात येईल त्या दिनाकांस घेण्यात येते.
- संबंधित जिल्हाधिकारी हे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी तसेच प्रभाग (वार्ड) विभागणीचे संपूर्ण कामकाज पाहत असतात.
- ग्रामपंचायत निवडणुकी करिता स्वतंत्र अशी मतदार यादी बनविण्यात येत नसून, संबंधित महाराष्ट्र विधानसभेची यादी वापरण्यात येते.
- प्रभागाप्रमाणे विभागणी केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोग निर्देशित करेल त्या तारखेला तहसीलदार मार्फत प्रसिद्ध केली जाते.
- मतदार यादीत नाव असलेल्या आणि १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येतो.
- एखाद्या मतदाराचे एकापेक्षा जास्त वेळा एकाच किंवा वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव असल्यास त्याला एका पेक्षा जास्त वेळा मतदान करता येत नाही.
- एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदविल्यास जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत शिक्षा करण्याची तरतूद आहे.
- ग्रामपंचतीचा व सदस्यांचा कालावधी ५ वर्षे इतका असतो आणि तो ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणला जातो.
- ग्रामपंचायत निवडणूकांसाठी एक किंवा अनेक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक तहसिलदार करतात. तसेच मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार करतात.
- उमेदवाराला मागणीप्रमाणे नामनिर्देनपत्र पुरविण्याची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची असते.
- ग्रामपंचतीचा निवडणूक कार्यक्रम तहसिल, ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर सूचना देऊन, गावातील चावडीच्या ठिकाणी सूचना देऊन व दवंडी देऊन इ. पद्धतीने प्रसिध्द केला जातो.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मोफत सरपंच निवडणूक नियम 2022 PDF डाउनलोड करू शकता.