पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi PDF Marathi

पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi Marathi PDF Download

Free download PDF of पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi Marathi using the direct link provided at the bottom of the PDF description.

DMCA / REPORT COPYRIGHT

पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi Marathi - Description

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी पितृ पक्ष तर्पण विधि मराठी PDF / Pitru Tarpan Pooja Vidhi in Marathi PDF घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला खूप काही मिळेल. श्राद्ध कसे करावे PDF यामध्ये तुम्हाला श्राद्धाचे सर्व विधी आणि मंत्र वाचायला मिळतील. श्राद्धाची वेळ ‘कुपत’ काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च्या आसपास) श्राद्ध केले गेले पाहिजे. याचे आमंत्रण आदल्या दिवशी पुरोहिताच्या घरी जाऊन आदराने द्यावे. ब्राह्मणांची संख्या एक, तीन, पाच अशी विषम असावी. प्रथम त्यांना हात, पाय धुवायला पाणी द्यावे. नंतर आचमन करून त्यांना आसनावर बसवून प्रेमाने वाढावे. वाढतांना शांत असावे, रागावू नये. मनात श्रद्धा, विश्वास हवा. जेवणानंतर मुख-शुद्धी तसेच दक्षिणा, वस्त्र, रत्न, पात्र या सारखे आपल्या ऐपतीप्रमाणे (यथाशक्ती- दान करावे. ब्राह्मण व आमंत्रितांच्या जेवणानंतर गरीब, तसेच अनाथांनाही संतुष्ट करावे.

पितृपक्षातील श्राद्ध तर्पण विधी मराठी PDF | Tarpan Vidhi in Marathi PDF

पितृ पंधवड्यात पूर्वजांना जल अर्पण करण्याच्या विधीला तर्पण असे म्हणतात. पूर्वजांना अर्पण करावयाचे तर्पण कसे करावे? यावेळी कोणते मंत्र म्हणावेत? याविषयी जाणून घेऊया…
‘ॐ आगच्छन्तु में पितर एवं ग्रहन्तु जलान्जलिम’
असा मंत्र म्हणून पूर्वजांचे स्मरण आणि आवाहन करावे. या मंत्राचा अर्थ असा की, पूर्वजांनो आपण येऊन जलांजली ग्रहण करावे, असा होतो.

पितृपक्षातील श्राद्ध तर्पण नियम | Pitru Shradh Tarpan Niyam

गरुड पुराणात श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन करण्यात आले आहे. त्यानुसार, ज्या व्यक्तींचे आई आणि वडील दोघेही हयात नाही, त्यांनी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत पाणी, तीळ, फूल यांचा समावेश करून श्राद्ध तर्पण करावे. ज्या तिथीला आई आणि वडिलांचे निधन झाले आहे, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करावे आणि यथाशक्ती ब्राह्मण भोजन करावे. पितृपक्षातील ब्राह्मण भोजनात दक्षिणा दिली जात नाही. जे श्राद्ध तर्पणाचे विधी करतात, त्यांनाच दक्षिणा द्यावी, असे शास्त्र सांगते.

वडिलांचे तर्पण करण्याचा मंत्र

सर्वप्रथम आपल्या गोत्राचे नाव घ्यावे. यानंतर, ‘गोत्रे अस्मतपिता (वडिलांचे नाव) शर्मा वसुरूपत् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः’, असा मंत्र म्हणून गंगाजल किंवा अन्य पाण्यात दूध, तीळ आणि जव घालावेत आणि ३ वेळा वडिलांना जलांजली अर्पण करावे. यानंतर आजोबांना यांना जल अर्पण करावे.

आजोबांना जल अर्पण करतानाचा मंत्र

सर्वप्रथम आपल्या गोत्राचे नाव घ्यावे. यानंतर, ‘गोत्रे अस्मत्पितामह (आजोबांचे नाव) शर्मा वसुरूपत् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः’, असा मंत्र म्हणून आजोबांना ३ वेळा जल अर्पण करावे.

आईला तर्पण अर्पण करण्याचा मंत्र

ज्या व्यक्तींची आई पंचत्वात विलीन झाली आहे, त्यांनी आईला तर्पण अर्पण करावे. मात्र, याचा मंत्र हा वडील आणि आजोबा यांना अर्पण करावयाच्या तर्पणापेक्षा वेगळा असतो. याचे नियमही भिन्न आहेत. आईचे ऋण सर्वात मोठे असल्यामुळे आईचे तर्पण अधिकवेळा जल अर्पण करून केले जाते.
सुरुवातीला गोत्राचे नाव घ्यावे. यानंतर ‘गोत्रे अस्मन्माता (आईच नाव) देवी वसुरूपास्त् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जल वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः’, असा मंत्र म्हणावा. यानंतर पूर्व दिशेला १६ वेळा, उत्तर दिशेला ७ वेळा आणि दक्षिण दिशेला १४ वेळा जलांजली अर्पण करावे, असे सांगितले जाते.

आजीच्या नावाने तर्पण

सुरुवातीला गोत्राचे नाव घ्यावे. यानंतर, ‘गोत्रे पितामां (दादी का नाम) देवी वसुरूपास्त् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जल वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः’, असा मंत्र म्हणावा. जसे आईला तर्पण अर्पण केले जाते, तसेच ते आजीलाही करावे. श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे आई-वडील, आजी-आजोबा यांना तर्पण अर्पण करताना ते अत्यंत श्रद्धापूर्वक आणि मनापासून त्यांचे स्मरण करून करावे, असे सांगितले जाते.
You may also Like :

 
Here you can download the पितृ पक्ष तर्पण विधि मराठी PDF / Pitru Tarpan Pooja Vidhi in Marathi PDF by click on the link given below.

Download पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi PDF using below link

REPORT THISIf the download link of पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If पितृ पक्ष तर्पण विधि मराठी | Pitru Tarpan Pooja Vidhi is a copyright material Report This by sending a mail at [email protected]. We will not be providing the file or link of a reported PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *