NetaJi Subhash Chandra Bose Information in Marathi PDF Summary
Dear readers, here we are offering NetaJi Subhash Chandra Bose Information in Marathi PDF to all of you. Subhash Bose was born into a large Bengali family in Orissa. He was sent to England to take the Indian Civil Service Examination.
He passed the examination but did not appear in the final examination citing nationalism as a high standard. Returned to India in 1921 to join the national movement led by Mahatma Gandhi and the Indian National Congress. Bose joined the group led by Jawaharlal Nehru.
This group was less keen on constitutional reform and more open to socialism. In 1938, he became the President of Congress. He was re-elected in 1939, but he later fell out with Mahatma Gandhi. Senior Congress leaders supported Gandhi. Bose then resigned from the post of President.
NetaJi Subhash Chandra Bose Information in Marathi PDF 2023
नेताजी असे त्यांना प्रथम १९४२ च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते. आता संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हटले जाते. सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी १९२१ मध्ये भारतात परत आले.
बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. १९३८ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३९ मध्ये पुन्हा निवडून आले, पण पुढे ते आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एप्रिल १९४१, मध्ये बोस नाझी जर्मनीमध्ये पोहोचले. बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी त्यांनी वापरला. बोस यांच्या नेतृत्वात एर्विन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या ३,००० भारतीयांची भरती फ्री इंडिया लीजनमध्ये करण्यात आली. एडॉल्फ हिटलरने मे १९४२ च्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली.
याच काळात बोस हे वडीलही झाले[५][६]; त्यांची पत्नी, किंवा सोबती, एमिली शेंकल यांनी एका मुलीला जन्म दिला. नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले. त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे १९४३ मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले. जपानच्या पाठिंब्याने, बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली, ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता. जपान-व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानने त्याचे प्रमुखपद बोस यांना दिले. जरी बोस असामान्य आणि प्रतिभाशाली होते, तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते[९], तसेच त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळच टिकला.
१९४४ च्या उत्तरार्धात आणि १९४५ च्या सुरुवातीस, ब्रिटीश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला. यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली. यानंतर बोस हे सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले. १८ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही, बोस भारतात परत येतील अशी अपेक्षा ते करत होते.
भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले. ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या ३०० अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला, पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले.
भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत. पण हुकूमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे, हे टीकेचे एक कारण होते. जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्यांचारावर जाहीरपणे टीका करण्याचे त्यांनी टाळले. तसेच पीडितांना भारतात आश्रय देण्याचीही अनिच्छा दर्शवली. पण हे सर्व जागरूकतेच्या अभावामुळे घडले असेही म्हणता येणार नाही.
NetaJi Subhash Chandra Bose Life Information in Marathi
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते. प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते. आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.
NetaJi Subhash Chandra Bose Education Information in Marathi
लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
You can download NetaJi Subhash Chandra Bose Information in Marathi PDF by clicking on the following download button.