अर्थसंकल्प 2023 महाराष्ट्र | Maharashtra Budget 2023-24 Marathi PDF Summary
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी अर्थसंकल्प 2023 महाराष्ट्र PDF / Maharashtra Budget 2023-24 PDF in Marathi आणले आहे ज्याद्वारे आपण ते सहजपणे डाउनलोड करू शकता. बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमाखर्च. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचा बेत आहे याबाबदचे विवरणपत्र होय. वेगवेगळी मंत्रालयं, राज्यं, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था, संरक्षण विभागातली विविध खाती हे सगळे आपल्या मागण्या किंवा खर्चाचा अंदाज बजेट डिव्हिजनला देतात. या लेखात, आम्ही Maharashtra Arthsankalp 2023 in Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी थेट दुवा दिला आहे.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्यांनी यंदा अर्थसंकल्प सादरीकरणाची नवी पद्धत राज्यात आणली आहे. यंदा प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प आयपॅडवर वाचण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नवी प्रथा सुरू केली आहे.
अर्थसंकल्प 2023 महाराष्ट्र PDF | Maharashtra Budget 2023-24 PDF in Marathi – Key Points
- शाश्वत शेती समृध्द शेती. या योजनेसाठी एकूण 29163 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
- प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
- राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
- 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
- भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
- 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
- एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस सुरु करणात
- डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
- पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम.
खाली डाउनलोड बटणावर क्लिक करून, आपण खाली क्लिक करून अर्थसंकल्प 2023 महाराष्ट्र PDF / Maharashtra Budget 2023-24 PDF in Marathi डाउनलोड करू शकता.