Krishna Janmashtami Puja Vidhi Marathi PDF Summary
आम्ही तुमच्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा विधि मराठी आणली आहे जी तुम्ही तुमच्या घरी करू शकता. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, परंतु प्रत्येक व्रत योग्य पूजा विधीशिवाय अपूर्ण आहे. येथे आपण योग्य चरण-दर-चरण पूजा विधी मिळवू शकता जी आपल्या घरी पूर्ण श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव करण्यास मदत करेल. आपण संपूर्ण जन्माष्टमी पूजा विधि मराठी मध्ये डाउनलोड करू शकता.
Shri Krishna Janmashtami Puja Vidhi in Marathi :
- जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा.
- यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
- यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा.
- श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे.
- गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.
- जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा.
- याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता.
- श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.
अरे माझ्या गोपाळ कृष्णा आरती Lyrics | Are Mazya Gopal Krishna Aarti Lyrics in Marathi :
अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी मी आरती ||धृ||
शुद्ध गंगास्नान भावे घालीन तुला, गंध केशरी लावीन वरती। १।
अरे माझ्या गोपाळ कृष्णा….
पिवळा पितांबर नेसविन तुला,
शेला हिरवा घालीन वरती । २।
अरे माझ्या गोपाळ कृष्णा….
कुंडलांची प्रभा मुकुटाची शोभा,
तुळस मंजिरी वाहीन वरती। ३।
अरे माझ्या गोपाळ कृष्णा….
सुवर्णाच्या ताटी, पक्वान्नांची दाटी,
दह्या-दुधाने भरीन वाटी। ४।
अरे माझ्या गोपाळ कृष्णा….
शांती तबकात क्षमा फुलवात नित्य राहावे हो तुझं पाशी। ५।
अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी मी आरती । धृ।
You can download the Krishna Janmashtami Puja Vidhi in Marathi PDF by clicking on the following download button.
खालील डाउनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही कृष्ण जन्माष्टमी पूजा विधि मराठी पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता.