खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information PDF Marathi

खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information Marathi PDF Download

Free download PDF of खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information Marathi using the direct link provided at the bottom of the PDF description.

DMCA / REPORT COPYRIGHT

खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information Marathi - Description

Dear readers, today we are going to share खाशाबा जाधव (यांची) माहिती मराठी PDF / Khashaba Jadhav Information in Marathi PDF for all of you. As you all know that India has a tradition of great sportsmen. There are many sportspersons who were born in India and grew up and also fought for our country.

Khashaba Dadasaheb is one of them who is best known as a wrestler. Today in this article you can easily know Khashaba Jadhav story in Marathi who was a great wrestler. Khashaba Dadasaheb Jadhav was born on 15 January 1926  in Satara district, Bombay Presidency, British India and died on 14 August 1984 in Karad, Maharashtra, India.

Khashaba Jadhav was one of the most Indian athletes who won a bronze medal. Along with this, in the Olympics, Khashaba Jadhav was the first athlete from independent India to win an individual medal. Khashaba is the only Indian Olympic medalist who never received a Padma Award in his life.

खाशाबा जाधव ची माहिती मराठी PDF | Khashaba Jadhav Mahiti Marathi PDF

वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव
टोपणनाव केडी (KD), पॉकेट डायनामो
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान रेठरे, कराड तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
जन्मदिनांक जानेवारी १५, इ.स. १९२६
जन्मस्थान गोळेश्वर, सातारा
मृत्युदिनांक ऑगस्ट १४, इ.स. १९८४
मृत्युस्थान कराड, सातारा
उंची ५’६”
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर इ.स. १९५२ हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा’: ५२ किलो. फ्रीस्टाइल कुस्ती; कांस्य

खाशाबा जाधव Information PDF in मराठी

  • भारताला १९५२ साली पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव या कुस्तीपटूंनबद्दल विशेष गोष्ट हि कि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिलं वैयक्तिक ऑलम्पिक कांस्य पदक त्यांनी आपल्या भारताला मिळवून दिलं.
  • सातारा जिल्ह्यातील एका लहान गावात जन्माला आलेल्या खाशाबांना कुस्तीचं बाळकडू घरातच मिळालं. त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दादासाहेब सुद्धा उत्तम कुस्तीपटू होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासूनच खाशाबा कुस्तीतील बारकावे शिकू लागले.
  • वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षीच एका प्रसिद्ध पहिलवानाला चितपट करून खाशाबांनी सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. पुढे सर्वदूर होणाऱ्या कुस्तीत सहभाग घेऊन खाशाबा मातब्बरांना धूळ चारू लागले.
  • कराड येथील टिळक विद्यापीठात १९४० ते १९४७ दरम्यान शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर खाशाबांनी आपलं संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रित केलं. खाशाबांच्या कुस्तीतील कामगिरिची चर्चा सगळीकडे होऊ लागली.
  • त्यांच्यातील प्रतिभा ओळखून कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांना खाशाबा मध्ये असलेल्या गुणांचं चीज व्हावं असं मनोमन वाटून गेलं

Information About Khashaba Jadhav in Marathi

  • खाशाबांच्या वडीलांना देखील हि चांगली संधी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी घरची शेती गहाण ठेवून खाशाबांना कुस्तीतील पुढच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवलं. कोल्हापूरच्या मराठा बोर्डिंग इथं राहून खाशाबा शिक्षण आणि तालीम यांचा अचूक मेळ बसवू लागले.
  • गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने त्यांचा ऑलम्पिक स्पर्धेचा मार्ग सुकर झाला. फ्लायवेट गटाकरता खाशाबांची लंडन ऑलम्पिक मध्ये १९४८ ला जेंव्हा निवड झाली त्यावेळी ते सहाव्या क्रमांकावर होते. इथवर पोहोचणारे भारतातील ते पहिले खेळाडू होते.
  • खाशाबा गादीवरचा कुस्तीप्रकार शिकलेले असल्याने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आणि तेथील नियमांचे त्यांना फारसे ज्ञान नव्हते. आणि त्यामुळे त्यांना पुढची फेरी देखील गाठता आली नाही.
  • पण त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९५२ ला हेलसिंकी हि फिनलंड ची राजधानी असलेल्या ठिकाणी ज्यावेळी ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तेंव्हा खाशाबा पूर्ण तयारीनिशी कुस्तीच्या रिंगणात उतरले होते.
  • हेलसिंकी इथं स्पर्धेला जाण्यासाठी पैसे नसल्याने गावकरी मंडळी यांनी लोकवर्गणी करून, ओळखीच्या लोकांनी त्यांना जमेल तशी मदत करून पैसे उभे केले.

Khashaba Jadhav Career Information in Marathi PDF

  • प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर सरांनी तर खाशाबाला ऑलम्पिक स्पर्धेला जाता यावं यासाठी स्वतःचं घर गहाण ठेऊन ७००० रुपये उभे केले.
  • खाशाबांचे कोल्हापूर चे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी देखील ३००० रुपयांची जमवाजमव केली अन खाशाबा ऑलम्पिक स्पर्धेला जाऊ शकले. त्या स्पर्धेत विविध देशातील २४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
  • खाशाबांनी मेक्सिको, जर्मनी, कॅनडा येथील स्पर्धकांना नमवून सेमी फायनल पर्यंत मजल मारली. आंतरराष्ट्रीय राजकारण आडवं आलं नसतं तर खाशाबा सुवर्णपदक घेऊनच परतले असते.
  • पण त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं तरीदेखील हि बाब देखील कमी महत्वाची ठरत नाही कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ऑलम्पिक स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक पदक ठरलं होतं. खाशाबांच्या नावावर हा रेकॉर्ड जवळपास ४४ वर्ष कायम होता.
  • लियांडर पेस या टेनिस पटूचं नाव दुसऱ्या क्रमांकावर १९९६ साली या यादीत समाविष्ट झालं. पदक पटकावून ज्यावेळी खाशाबा मायदेशी परतले त्यावेळी कराड रेल्वेस्थानकावर त्यांचे फार मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करण्यात आले होते.
  • शेकडो बैलगाड्या… ढोलताशे…. लेझीम पथकं… आतिषबाजी फटाके यांच्या धामधुमीत खाशाबांच्या गोळेश्वर या गावापर्यंत जंगी मिरवणूक निघाली.
  • खाशाबांच्या या विजयाने त्यांच्या लहानश्या गावाची ओळख संपूर्ण देशभर झाली होती.

To खाशाबा जाधव माहिती मराठी / Khashaba Jadhav Information PDF in Marathi Free Download, you can click on the following download button.

Download खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information PDF using below link

REPORT THISIf the download link of खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If खाशाबा जाधव ची माहिती मराठी | Khashaba Jadhav Information is a copyright material Report This by sending a mail at [email protected]. We will not be providing the file or link of a reported PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *