कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF in Marathi

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Marathi PDF Download

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती in Marathi PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of कर्मवीर भाऊराव पाटील माहिती in Marathi for free using the download button.

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Marathi PDF Summary

नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF साठी डाउनलोड लिंक देत आहोत. आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला कर्मवीर यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. पायगोंडा पाटील यांचे गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे हे होय.

भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती . भाऊरावांच्या स्वभावात लहानपणापासूनच बंडखोर वृत्ती दिसून येत होती.

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF – Highlights

नाव (Name): कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म (Birthday): 22 सप्टेंबर 1887
जन्मस्थान (Birthplace): ‘कुंभोज’ जिल्हा कोल्हापुर
मुळगांव: ‘ऐतवडे’ जिल्हा सांगली
वडिल (Father Name): पायगोंडा पाटील
आईचे नाव (Mother Name): गंगाबाई
पत्नीचे नाव (Wife Name): लक्ष्मीबाई (वयाच्या 18 व्या वर्षी लक्ष्मीबाईंसोबत विवाह)
संस्था (organization): रयत शिक्षण संस्था
पुरस्कार (Award): ‘पद्मभुषण’
मृत्यु (Death): 9 मे 1959

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF – महत्वाची कार्ये

  • 1919 साली बहुजन समाजाला शिक्षण मिळावे या उदात्त हेतुने शैक्षणिक संस्था सुरू करण्याकरीता प्रस्ताव मंजुर करून घेतला.
  • 1919 साली 4 ऑक्टोबर ला विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊरावांनी ’’रयत शिक्षण संस्था’’ स्थापन केली.
  • या संस्थेची स्थापना काले (सातारा जिल्हा) या गावी करण्यात आली होती
  • काले या गावीच या संस्थेच्या वतीनं वसतिगृह, प्राथमिक शाळा, आणि एका रात्रशाळेची त्यांनी सुरूवात करून शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा केला.
  • भाऊरावांनी विद्याथ्र्यांमधे समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जाणीव यांची बीजं रोवली
  • रयत शिक्षण संस्थेची चतुःसुत्री म्हणजे स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय.
  • शिक्षणाच्या दृष्टीकोनातुन जो वर्ग मागासलेला आहे त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना निशुल्क शिक्षण मिळावं, वेगवेगळया धर्मातील, पंथातील विदयाथ्र्यांना एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण व्हावी, जुन्या चालिरीतींना मुठमाती देउन विद्याथ्र्यांमधे विकासाचे संस्कार घडवावे, एकजुटीचे महत्व पटवुन देणे, विदयार्थी काटकसरी, स्वावलंबी, उत्साही आणि चारित्र्यवान घडविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता प्रसंगी संस्थेचा क्षे़त्रीय दृष्टया विस्तार करणे ही या रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टं होती.
  • 1921 साली भाऊराव पाटील महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले. गांधीजींच्या विचारांचा भाऊरावांवर खोल परिणाम झाला. त्यांनी गांधीजींप्रमाणेच खादीचा स्विकार केला. आणि आपल्या आयुष्यात महात्मा गांधीजींच्या तत्वांना पुर्णतः अंगिकारले.
  • भारत सरकारनं कर्मवीर भाऊराव पाटलांना ‘पद्मभुषण’ या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
  • पुणे विद्यापीठाने 1959 साली ’डॉक्टर ऑफ लिटरेचर’ या पदवीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील महिती PDF सहज डाउनलोड करू शकता.

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती pdf

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF Download Link

REPORT THISIf the download link of कर्मवीर भाऊराव पाटील माहिती PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If कर्मवीर भाऊराव पाटील माहिती is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.