कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha PDF Marathi

कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha Marathi PDF Download

Free download PDF of कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha Marathi using the direct link provided at the bottom of the PDF description.

DMCA / REPORT COPYRIGHT

कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha Marathi - Description

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी कृष्णाच्या जन्माची कहाणी PDF / Janmashtami Vrat Katha Marathi PDF अपलोड केली आहे. भगवान श्री कृष्णाचा जन्म दिवस श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. श्री कृष्णाचा वाढदिवस जन्मोत्सव आणि नंदोत्सव म्हणूनही ओळखला जातो. भारतासह जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने, देश -विदेशातून भक्त मथुरा स्थित श्री कृष्णाच्या जन्मस्थळी आपल्या लाडक्या कान्हाच्या दर्शनासाठी येतात. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, भक्त त्याच्यासाठी उपवास ठेवतात आणि मध्यरात्री लाला (श्री कृष्ण) चा जन्म साजरा केल्यानंतर काही अन्न घेतात. ब्रज प्रदेशात राहणारे ब्रजचे लोक भगवान श्री कृष्णाला प्रेमाने लाला म्हणतात.

कृष्णाच्या जन्माची कहाणी pdf / Janmashtami Vrat Katha in Marathi

श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की, कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पूत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.

मराठीतील श्री कृष्णा आरती गीत / Shri Krishna Aarti Lyrics in Marathi

श्री कृष्णाची आरती

ओवालू आरती मदनगोपाळा।

श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।

ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।

वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।

तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

एका जनार्दनी देखियले रूप।

रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

 

जन्माष्टमीच्या व्रतामध्ये संयम / कृष्ण जन्माष्टमी व्रत कथा मराठी PDF

एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे. बाजारातली उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतंच, पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा, बाहेरचे चटपटीत पदार्थ, चहा, नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका. दररोज अन्न आणि पाणी ग्रहण करतोच, या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा.

Krishna Janmashtami Puja Vidhi in Marathi / जन्माष्टमीचे व्रत कसे करावे

  • जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा.
  • यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
  • यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा.
  • श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे.
  • गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.
  • जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा.
  • याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता.
  • श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.

You can download the Janmashtami Vrat Katha Story in Marathi PDF by going through the following download button.

Download कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha PDF using below link

REPORT THISIf the download link of कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If कृष्णाच्या जन्माची कहाणी | Janmashtami Vrat Katha is a copyright material Report This by sending a mail at [email protected]. We will not be providing the file or link of a reported PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *