15 ऑगस्ट मराठी भाषण | Independence Day Speech Marathi - Description
नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला 15 ऑगस्ट मराठी भाषण PDF / Independence Day Speech PDF in Marathi साठी डाउनलोड लिंक देत आहोत. नमस्कार मित्रांनो आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संबंध देशातील शासकीय शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. या पोस्टवरून तुम्ही फक्त एका क्लिकवर सहज स्वातंत्र्य दिन भाषण मराठी PDF / Independence Day Speech in Marathi PDF डाउनलोड करू शकता.
स्वातंत्र्य दिनावरिल भाषण तुम्हाला शालेय जीवनात विविध स्पर्धाकरीता खुप उपयोगी पडेल. खालील लेखात दिलेले भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती. या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण.
15 ऑगस्ट मराठी भाषण PDF | Independence Day Speech PDF in Marathi
आदरणीय विचारमंच, विचारमंचावरील अध्यक्ष महोदय, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नम्रपणे ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करतो.
मित्रांनो, सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. इंग्रजांनी आपल्या देशातील नागरिकांना गुलाम म्हणून वागवले. आणि शेवटी तो सुवर्ण दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.
मित्रांनो, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामांच्या उठावातच स्वातंत्र्याचे पाळेमुळे रुजली होती. झाशीची राणी, तात्या टोपे इ. वीरांच्या प्रेरणेने झालेले प्रथम स्वातंत्र्ययुध्द आज स्मरणीय आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली, त्यानंतर लाल, बाल, पाल, आणि नेहरु, गांधीजींच्या अहिंसा तत्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजाशी सामना केला.
वि. दा. सावरकर, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, कान्हेरे, चाफेकर बंधू या स्वातंत्र्य वीरांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. काही देशभक्त हसतहसत फासावर चढले. त्यांनी वीरमरण पत्करले आणि इंग्रज सरकारने चालविलेल्या दडपशाही, जुलमी कायदे यांचा प्रतिकार करण्याची जनतेला हाक दिली. १९४२ च्या ‘चलेजाव’ च्या लढ्यात आंदोलनाचे पुढे उग्ररुप धारण केले. नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेनेही अभूतपूर्व कार्य केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली आणि जवळजवळ १५० वर्ष हिंदुस्थानवर फडकणारे ‘युनियन जॅक’ ऐवजी ‘तिरंगा’ ध्वन डोलाने फडकविला गेला.
स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्याऱ्या त्या हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांचा आदर्श, त्याग, सेवा व प्रखर राष्ट्रप्रेम स्वजीवनात आणले जाईल, तेव्हाच राष्ट्राचे परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्यावे सुराज्य होईल.
जय हिंद जय महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिन भाषण मराठी PDF | Independence Day Speech in Marathi PDF
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा – सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साग आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.
चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
तिरंगा आमुचा ध्वज,
उंच उंच फडकवू ..
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू ..
धन्यवाद !
भारत माता की जय ! वंदे मातरम् !!
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही 15 ऑगस्ट मराठी भाषण PDF / Independence Day Speech PDF in Marathi मोफत डाउनलोड करू शकता.