हरतालिकेची कहाणी | Hartalika Teej Vrat Katha Marathi PDF Summary
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी हरतालिकेची कहाणी PDF / हरतालिका तीज व्रत कथा मराठी PDF / Hartalika Teej Vrat Katha PDF in Marathi घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला उपवासाची कथा, उपासना पद्धत, आरती आणि उपवासाचे महत्त्व याबद्दल बरेच काही वाचायला मिळेल. हरतालिका तीज हा पवित्र सण आहे आणि यावर्षी हरतालिका तीज मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला उपवास करतात आणि नंतर पूजेनंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास मोडला जातो. जरी एका वर्षात चार तीज असतात, परंतु हरतालिका तीज या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची मानली जाते. हा पती अविवाहित मुलींकडून चांगला नवरा मिळवण्यासाठी पाळला जातो. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Hartalika Teej Vrat Katha Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी थेट दुवे देखील दिले आहेत.
या व्रताच्या भक्ताला निद्रा वर्ज्य असते, त्यासाठी रात्री भजन कीर्तनासह रात्र जागरण करावे लागते. सकाळच्या वेळी स्नान केल्यानंतर, श्रद्धेने व भक्तीभावाने, योग्य विवाहित स्त्रीने शृंगार, कपडे, खाद्यपदार्थ, फळे, मिठाई आणि दागिने यथाशक्ती दान करावे.
हरतालिकेची कहाणी कथा PDF | Hartalika Teej Vrat Katha PDF in Marathi
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.