डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचि महिती | Dr Babasaheb Ambedkar Yachi Mahiti Marathi PDF Summary
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सर्वांच्या मदतीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचि महिती PDF / Dr Babasaheb Ambedkar Yachi Mahiti PDF अपलोड करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते एक आघाडीचे कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉक्टर. भीमराव आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी आणि भारतातील मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी वाहून घेतले. डॉक्टर. आंबेडकर हे दलितांचे रक्षक म्हणून ओळखले जातात.
आज दलितांचे समाजात जे स्थान आहे त्याचे संपूर्ण श्रेय डॉ भीमराव आंबेडकरांना जाते. डॉ. भीमराव आंबेडकर बी.आर. आंबेडकर यांनी सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या निराशेवर मात करून त्यांना समानतेचा अधिकार दिला. आंबेडकरांनी जातीभेद संपवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती PDF | Dr. B. R. Ambedkar Biography
नाव (Name): | डॉ. भिमराव रामजी आंबेडकर |
जन्म (Birthday): | 14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) |
जन्मस्थान (Birthplace): | महू, इंदौर मध्यप्रदेश |
वडिल (Father Name): | रामजी मालोजी सकपाळ |
आई (Mother Name): | भीमाबाई मुबारदकर |
पत्नी (Wife Name): | पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935) दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) |
शिक्षण (Education): | एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स |
संघ: | समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ राजनितीक विचारधारा: समानता |
प्रकाशन: | अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा ) |
मृत्यु (Death): | 6 डिसेंबर 1956 (Mahaparinirvan Diwas) |
डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांचे राजनैतिक करियर – B.R.Ambedkar Political Career
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी 1936 ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे 1937 ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने 15 सीटस् जिंकल्या त्याच वर्षी डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली.
त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ (शुद्र कोण होते?) ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली.
15 आॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (आॅल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी 1946 ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.
भीमराव आंबेडकरांनी तयार केले भारतीय संविधान – Constitution of India
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता.
29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला.
डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.
• Bharat संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला.
• अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट केले.
• महिलांना अधिकार मिळवुन दिले.
• समाजातील वेगवेगळया वर्गांमधे पसरलेल्या अंतराला संपवल.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचि महिती PDF / Dr Babasaheb Ambedkar Yachi Mahiti PDF डाउनलोड करू शकता.